डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना संसर्गाचा धोका लक्षात आल्यावर डोंबिवलीतील प्रभाग क्र. तरुण नगरसेवक विश्वदीप पवार, पत्नी श्रद्धा आणि त्याच्या सर्व टीमने वॉर्डात उत्तम पद्धतीने नियोजन केले आहे. नागरिकांना धान्य, भाजीपाला, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या फ्री होम डिलिव्हरीची उत्तम व्यवस्था केली आहे.जेष्ठ नागरिकांना लागणारी औषधे, एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांना जेवणाचा डबा व औषधे देण्याकडे नगरसेवक पवार यांच्या कार्यकर्त्याचे लक्ष असते.जी कुटुंबे स्वतःहून त्यांच्या जेवणात अधिक दोन पोळ्या बनवू शकतात अशा वॉर्डातील सामाजिक जाणिवा असलेल्या आणि मुख्यतः उत्साही कुटुंबांना बरोबर घेऊन `रोटी बँक` सुरु केली आहे. त्या माध्यमातून गरीब, असाहाय्य लोकांना पोटभर अन्न देण्याचे पुण्यकार्य ही टीम करत आहे.हे करतानाच प्रभाग क्र.६९ शिवमार्केट नागरिक, भाजपा, वॉर्डातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिळून PM CARES फंडात भरघोसपणे १,९०,१३५/- इतके योगदान दिले.
डोंबिवलीत धान्य, भाजीपाला, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या फ्री होम डिलिव्हरीची उत्तम व्यवस्था..
April 28, 2020
41 Views
1 Min Read

-
Share This!