महाराष्ट्र

सहेरी आणि इफ्तारीची सुविधा देत प्रशासनाची तत्परतता

 सामाजिक संस्थांकडूनही मदतीचा हात
शेल्टरमधील 180 मुस्लिम बांधवही पकडतायेत रोजा
नाशिकः लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यात दाखल झालेल्या इतर जिल्ह्यातील नागरिकांची शेल्टरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल 180 मुस्लिम बांधव असून रमजान सुरु झाल्याने या बांधवांना सहेरी आणि इफ्तारीची सुविधा प्रशासनाने शेल्टरमध्येच उपलब्ध करत धार्मिक आणि सामाजिकतेचा संदेश दिला आहे. एकवेळच्या जेवणाची जेथे भ्रांत असल्याने आपल्या गावी परतण्यासाठी निघालेल्या या सर्व मुस्लिम बांधवांना सहेरी भोजन आणि सायंकाळी रोजा सोडताना इफ्तारीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासासाठी न्यू उम्मीद आणि बोहरी ट्रस्टने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे.
विशेष म्हणजे पोस्टिंगच्या प्रतिक्षेत असलेले आणि कोरोना संकटात स्वतःहून आपत्तीसाठी काम करण्याची  जिल्हाधिकार्‍यांकडे विनंती करुन कार्यरत झालेले उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे शेल्टरची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्सिंगद्वारे सहेरी अन् इफ्तारी
शेल्टरमधील मुस्लिम बांधव रोजा पकडणार असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आम्ही न्यु उम्मीद आणि बोहरी ट्रस्टला विनंती केली. त्यांनी भोजन आणि फळे, सुका मेवा, खजूर उपलब्ध करुन दिले. एका रुममध्ये 4 जण असल्याने सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात आहे. तर मुस्लिम बांधवांव्यतिरिक्त इतर धर्मियांना जैन सकल समाज संस्थेच्या वतीने भोजन दिले जात आहे — नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी
सहेरीचे भोजन, इफ्तारीसाठी फळांचीही सुविधा
सहेरीसाठीचे भोजन हे रात्री 11 ते 11.30 वाजेच्या दरम्यान शेल्टरमध्ये त्यांना उपलब्ध होते. सर्व बांंधव सहेरी भोजन करुन रोजाला सुरुवात करतात. तर सायंकाळी रोजा संपताना इफ्तारीसाठीचे फळ, सुकामेव्याचे पदार्थ,  खजुरांचीही व्यवस्था केली जाते. 4 ते 4.30 वाजेदरम्यान त्यांच्यापर्यंत ते पोहोचविले जाते. नाशिकचे सेवानिवृत्त मंडळाधिकारी सईद शेख ह या बांधवांना रोट देत सामाजिकता जपत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!