ठाणे

आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दररोज ३००० गरजूंना अन्नवाटप..

डोंबिवली ( शंकर जाधव ): कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असलेल्या, वृद्ध व्यक्ती यांना आपले पोट भरणे मुश्कील होत आहे. एकीकडे सरकार यासाठी प्रयत्न करत असताना डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून `अन्नछत्र` सुरु केले आहे.दररोज सुमारे ३००० हजार गरजूंना लोकांना यांना अन्नवाटप सुरु करण्यात आले आहे. हे अन्नवाटप अनेक दिवसांपासून सुरु असून यासाठी कार्यकर्ते अश्या लोकांसाठी मेहनत घेत आहेत.

लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपले पोट कसे भरावे असा प्रश्न पडला पडला.काही वृद्ध जे घरात एकटे राहतात आणि घराबाहेर पडू शकत नाही, हातावर पोट असलेले, तसेच विधवा महिला अश्या सुमारे ३००० लोकांना डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून अन्नवाटप केले जाते. दररोज वृद्धांना त्यांच्या घरी जाऊन जेवण दिले जाते. ज्यांना शक्य आहे त्यांना इमारतीच्या खाली बोलावून अन्न दिले जाते.यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहे. लॉकडाऊन संपेपर्यत हि सेवा सुरु राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आमदार चव्हाण यांनी या कामाबद्दल डोंबिवलीकरांनी त्यांचे आभार मानले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!