महाराष्ट्र

गुणी कलावंत हरपला

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि. ३० :  ऋषी कपूर यांच्या अचानक जाण्याने आपण एका गुणी कलावंताला मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

अमित देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, ऋषी कपूर यांनी गेल्या पाच दशकाच्या कालावधीत हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने वेगळी छाप पाडली होती. विशेषतः तरुणांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते. मेरा नाम जोकर पासून सुरू झालेल्या त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीनंतर त्यांनी रफूचक्कर, बॉबी, हम किसीसे कम नही,  असे एकाहून एक सरस चित्रपट दिले. फिल्म फेअर आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. त्यांच्या अचानक जाण्याने आपण बॉलिवूडमधील एक गुणी कलावंत गमावला आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द दीर्घकाळ स्मरणात राहील.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!