डोंबिवली ( शंकर जाधव ) लॉकडाऊन मध्ये नागरिकांना घरातच थांबावे लागत आहे.मात्र मुंबईत आणि पुण्यात कोकणातील काही जण अडकून राहिले आहेत. त्यांना आपल्या कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी सरकारचे विचारधीन आहे.मात्र रेड झोन मधील मुंबई आणि पुण्यातील काही भागातील अश्या नागरिकांना कोकणात पाठवताना त्यांची कोरोना तपासणी करावी अशी विनंती मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांनी सरकारकडे केली आहे.सरकारने याचा विचार करावा असे नागरिकांचे म्हणणे आहे.
आज अनेक कोकणातील नागरीक मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाऊ शकत नाही. तसेच कोकणात आलेले मुंबई, उपनगर आणि पुणे येथील नागरिक आपल्या घरातच थांबले आहेत. त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यास सरकरने विचार करावा असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई आणि पुण्यातील काही ठिकाणी कोरीना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर केले आहे. त्यामुळे रेड झोन मधील नागरिकांना कोकणातील आपल्या गावी जाण्यासाठी सरकारने त्यांची कोरीना तपासणी करूनच पाठवणे अशी मागणी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यानी केली आहे.राज्य सरकार यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.