ठाणे

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे तोडकाम लॉकडाऊनमूळे अवघ्या १५  दिवसांत पूर्ण

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या  कोपर पुलाचे तोडकाम अवघ्या 15 दिवसांत पूर्ण झाले आहे. एरव्ही याच कामासाठी किमान 90 दिवस (3 महिने) लागले असते परंतु लॉकडाऊनमूळे ते लवकर पूर्ण करणे शक्य झाल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचा फायदा घेण्याच्या उद्देशाने, रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विनंतीनुसार महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार कोपर उड्डाणपूल पुर्नःबांधणीचे काम १७  एप्रिल २०२०  पासून सुरु करण्यात आले होते. रेल्वे प्रशासनाचे सहकार्य घेऊन प्रत्येक ट्रॅककरिता वाहतूक आणि विद्युत पुरवठा खंडीत करुन टप्याटप्याने संपूर्ण सहा ट्रॅकवरील पूलाचे तोडकाम पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे सेवा सुरू असती तर हेच काम करण्यासाठी किमान ३  महिने कालावधी लागला असता. परंतु संचारबंदीचे कालावधीत काम सुरु करण्‍याबाबत निर्णय झाल्याने अवघ्या १५  दिवसात हे तोडकाम पूर्ण करणे शक्य झाले आहे.पूलाच्या सबस्‍क्‍ट्रचरच्या दुरुस्‍तीचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येणार असून त्यानंतर डेस्क स्लॅब पुर्नःबांधणीचे काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. हे काम शहर अभियंता, सपना कोळी-देवनपल्‍ली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता(विशेष प्रकल्प) तरुण जुनेजा यांचेमार्फत सुरु असून कामाचे ठेकेदार पुष्पक रेल कन्ट्रक्शन प्रा.लि. हे आहेत. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी या कामाची पाहणी करून पुलाचे राजाजी पथवरील अंडरपाससह पुर्नःबांधणीचे काम पुढील सहा महिन्याच्या कालावधीत पुर्ण करणेबाबतचे निर्देश दिले आहेत. हे काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडील अतिरिक्त रेल्वे प्रबंधक आशुतोष गुप्ता , वरिष्ठ विभागीय अभियंता ( ऊ. पु.) मळभागे यांचे विशेष सहकार्य लाभले.  ३० एप्रिल २०२०   रोजी रेल्वे ट्रॅकवरील तोडकाम पूर्ण झाले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!