संपुर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतात निर्माण झाली आहे. या अनुशंगाने खबरदारीचा उपाय म्हणुन सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. सद्यस्थिती पहाता हा निर्णय योग्यच ठरतो. लॉकडाऊनमुळे शाळा व कॉलेजांना सुट्ट्या देण्यात आल्या. कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती कधीपर्यंत आटोक्यात येईल हे सांगता येत नाही. यामुळे मात्रं संपुर्ण भारतातील अणि महाराष्ट्रातील शिक्षण प्रक्रिया मात्र पुर्णतः थांबल्याचे चित्र आपणा सर्वांना दिसत आहे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतिला तंत्रस्त्रेही अध्यापनाचा पर्याय देण्याची वेळ आली आहे. या अनुषंगाने मुंबई प्रदेश आर्य विद्या सभा यांचे गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स, घाटकोपर पुर्व, या महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी अशाही विपरीत परिस्थितीत अध्ययन – अध्यापनाची प्रक्रिया सुरू रहावी म्हणुन तातडीची पाउले उचलली आहेत.
या कार्यात मोलाचे मार्गदर्शन लाभले ते या संस्थेच सन्माननीय सचिव श्री. राजप्रकाश कामदार यांचे. श्री. राजप्रकाश कामदार यांनी ‘टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क’ या शीर्षका अंतर्गत महाविद्यालयाच्या यूट्यूब चॅनल वरुन शिक्षक व विद्यार्थ्यांना संबोधित केले व संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच या वैश्विक महामारीच्या काळात सर्वांना सुरक्षित घरी राहुन महाराष्ट्र सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नंदिता रॉय व उपप्राचार्या कु. जान्हवी राव यांनी महाविद्यालयात होणार्या परीक्षांबाबत कोणताही संभ्रम न बाळगता सुरक्षित घरी राहण्याचे आवाहन केले.
या वैश्विक महामारी विरोधात लढणार्या योध्याना मानवंदना व प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालयातील सर्व कर्मचार्यांनी “एक नाम हिन्दोस्तान – तेरे हर जज़्बेको सलाम” या नावाची चित्रफीत तयार करून प्रसारीत करण्यात आली.
या सद्दस्थितीत अध्ययन – अध्यापनाची प्रक्रिया पुर्णतः बंद होऊ नये यासाठी महाविद्यालयाने ऑनलाइन पद्धतीचा वापर केला आहे. शिकण्या – शिकवण्याच्या प्रक्रियेतील दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग अधिक प्रभावी ठरतो आहे. शिक्षकांचा व्यावसायिक व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी वेगवेगळ्या विषयांवरील वेबीनार, आरोग्य सत्र, प्राध्यापक विकास कार्यक्रमांत उपस्थिती दर्शविली.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी चार दिवसांचे ऑनलाइन समुपदेशन मालिका आयोजीत केली होती. यात विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले. यात COVID – 19 विषयी जनजागृती करणे, मास्क बनविणे आणि त्याचे वितरण करणे, कोरोना विषयी चित्रफित व पोस्टर द्वारे जनजागृती करणे यांचा समावेश होता.
या वैश्विक महामारीत समाजातील सर्व घटकांशी असलेली आपली बांधिलकी जपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न महाविद्यालयाकडुन करण्यात आला.
……. शब्दांकन – श्री. राजेंद्र वरे