डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत असताना आजारी व्यक्तींनाही उपचारासाठी वणवण भटकावे लागत आहे.अश्यावेळी सामाजिक बांधिलकी असलेल्या व्यक्ती पुढे येऊन त्यांची मदत करताना दिसतात.एका 6 वर्षीय चिमुकलीचा जीव नगरसेवक कुणाल पाटील यांचा मदतीमुळे वाचला.
कल्याण येथील ६ वर्षाची हर्षदा किशोर पाटील ही अचानक बेशुद्ध पडली.घराबाहेर पाडाव तर लॉकडाऊन असल्याने सर्वत्र सामसूम अशी परिस्थिती दिसत होती.तिच्या घरच्यांना अश्यावेळी काय करावे ते सुचत नव्हते.तिच्या घरच्यांजवळ फारसे पैसे पण नव्हते. मग आता हर्षदावर अश्या परिस्थितीत उपचार होणार तरी कसे या विचाराने घरच्यांना काही सुचत नव्हते.त्यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांना फोन केल्यावर हर्षदाबद्दल सर्व माहिती दिली.नगरसेवक पाटील यांनी लगेच ‘ऑक्सिलीयम’ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना फोन केला.हर्षदालवर तात्काळ हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार करा अशी विंनती केली.हर्षदाला तिच्या घरच्यांनी हॉस्पिटला घेऊन गेल्यावर तिथे डॉक्टरांनी तिचा ‘एमआरआय ‘काढला आणि तिच्या ‘मेंदूत पाणी’ असल्याचे निदान झाले. हर्षदाला मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा.तिकडे या आजारावर उपचार होईल असे तिच्या घरच्यांना सांगितले. अश्यावेळी त्यांनी पुन्हा नगरसेवक पाटील यांना कॉल केल्यावर त्यांनी “काळजी करू नका.मी माझ्या परीने शक्य तेवढं सहकार्य करेन.नगरसेवक पाटील यांनी रुग्णवाहिका पाठवून हर्षदाला मुंबईतील येथे ऍडमिट केले. डॉक्टरांनी हर्षदाचा रिपोर्ट पाहिल्यावर परिस्थिती खूप गंभीर असल्याचे त्यांना जाणवले.तात्काळ ‘ऑपेरेशन’ करावे लागेल.पण अजून एक समस्या होती,वय कमी असल्यामुळे तिची शरीराची स्थिती खूप नाजूक होती.नगरसेवक पाटील यांनी डॉ.विकास कटारे आणि डॉ.ओमकार सूर्यवंशी यांना विनंती केली,कोणत्याही परिस्तिथीत हर्षदाला वाचावा अशी विंनती केली.सलग पाच दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांना ‘शस्त्रक्रिये’मध्ये यश आले असून हर्षदा सुखरूप आहे.डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आणि नगरसेवक कुणाल पाटील यांच्या विशेष सहकार्याने हर्षदा किशोर पाटील हिला जीवदान मिळाले असे तिच्या घरच्यांनी म्हणत त्यांचे आभार मानले.