ठाणे (8 मे, संतोष पडवळ ) : ठाणे महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 ची प्रभाग समिती निहाय माहिती आता डिजी ठाणे प्लॅटफॅार्मच्या माध्यमातून आता क्लीकवर ठाणेकरांना उपलब्ध होवू शकणार आहे. या मध्ये बाधित रुग्णांची संख्या, वयोगटानुसार आकडेवारी, कंटेन्टमेंट प्लॅन आदीची अद्ययावत माहिती आता डिजी ठाणे या डिजिटल प्रणालीने तयार केलेल्या http://essentials.thanecity.gov.in/ या
डॅशबॉर्डवर सर्व माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.
राज्यात सर्वत्र कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता ठाणे शहरात महापालिकेच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत.शहरातील नागरिकांना घरबसल्या कोरोना कोव्हीड 19 बाबतची माहिती मिळावी यासाठी डिजी ठाणेच्यावतीने एक विशेष डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर प्रभाग समिती निहाय कोरोना कोव्हीड 19 रुग्णांची माहिती, तारीख मुदतीनुसार कोव्हीड 19 रुग्णांची माहिती, संख्या, वयोगटानुसार पॉझिटिव्ह रुग्ण, कंटेन्टमेंट प्लॅन, सामुदायिक पातळीवरील टीएमसीचा पुढाकार आदी या सर्व बाबींची अद्ययावत माहिती पाहायला मिळणार आहे. नागरिकांनी ठाणे महापालिकेची कोरोना कोव्हीड 19 ची अद्ययावत माहिती पाहण्यासाठी http://essentials.thanecity.gov.in या लिंकवर भेट द्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.