ठाणे

कोरोनाबाधित आज तब्बल 100 रुग्ण बरे होऊन घरी ; कोव्हीड १९ घोषित रूग्णालयातील उपचारांचा सकारात्मक परिमाण

ठाणे (11 मे, संतोष पडवळ ) : ठाणे शहरात कोरोना कोव्हीड – १९ बाधित रुग्णांवर कोव्हीड १९ घोषित रूग्णालयाच्या उपचारांचा सकारात्मक परिणाम होत असून आज तब्बल 100 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने कोव्हीड १९ घोषित रूग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने आज पर्यंत एकूण व रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता वाढले आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ठाणे शहरातील बाधित रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तात्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. आज 100 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले असून आज पर्यत एकूण 224 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्टींगसाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये नवीन अत्याधुनिक लॅब सुरू आहे. तसेच कोव्हीड 19 रुग्णांना उपचार करणेसाठी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय (२५० खाटा ), कौशल्या रुग्णालय (६० खाटा ),होरायझॉन रुग्णालय ( ६० खाटा), वेदांत रुग्णालय (१०० खाटा) कलसेकर रुग्णालय . (१०० खाटा) ठाणे हेल्थ केअर रुग्णालय (५३ खाटा ), क्यरे रुग्णालय, बेथनी रुग्णालय या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये सध्या एकूण ३४ खाटांची सुविधा कोमॉपिंड सस्पेक्टेड रुग्णांसाठी उपलब्ध केलेली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय , कळवा येथे २० खाटांचा कोमॉपिंड सस्पेक्टेड आयसोलेशन वॉर्ड निर्माण करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी २५ खाटांची सुविधा कोमॉबिंड सस्पेक्टेड रुग्णांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे. असे एकूण ७९ खाटा सध्या कोमॉपिंड सस्पेक्टेड रुग्णासाठी उपलब्ध आहेत. कोव्हिड पॉसिटीव्ह लक्षणे असणाऱ्या रुग्णांना शहरातील सफायर हॉस्पिटलसह हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर आणि भाईंदरपाडा येथील डी बिल्डींगमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते.
या सर्व रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधान कारक असून योग्य उपचारामुळे जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!