डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर अंबरनाथ येथील पोलीस स्थानकांत उपस्थित राहून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये शासन निर्णय काटेकोर पणे पाळले जावेत व त्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसांठी आपल्या जिवाची पर्वा न करता गेले अनेक दिवस अहोरात्र सेवा देणाऱ्या या दक्ष पोलीस बंधू – भगिनी पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांचे कर्तव्य आणि निष्ठेबाबत त्यांचे मनापासून कौतुक करून त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता पोलिस बांधवांच्या संरक्षणासाठी पीपीई किट तसेच अन्नधान्याचे वाटप खा.डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. अहोरात्र जीवाची पर्वा व करणारे, सेवा देणाऱ्या सर्व पोलिस बांधवांनी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम केला. याप्रसंगी अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख श्री.राजेश मोरे, कल्याण पूर्व विधानसभा संघटक शरद पाटील ,उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पोलिस बांधवांच्या सरंक्षणासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पीपीई किट व अन्नधान्याचे वाटप
May 11, 2020
22 Views
1 Min Read

-
Share This!