ठाणे

मजुरांचा दिवा – वसई रेल्वे रुळावरून चालत  जीवघेणा प्रवास थांबवा – नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची मागणी

डोंबिवली  ( शंकर जाधव ) :  डोंबिवली मोठा गाव येथील दिवा वसई रेल्वे रूळ येथे  शेकडो परप्रांतीय मजूर चालत जात असुन या मार्गावर मालगाडी सुरु असल्याने औरंगाबाद सारखी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही .या पार्श्वभूमीवर स्थायी समिती चे माजी सभापती व नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीत असलेल्या दिवा-वसई रेल्वेरूळा वरून जीवघेणा प्रवास थांबवण्याची मागणी ठाणे पोलीस आयुक्तांसह पालिका आयुक्तांकडे केली आहे तसेच मुख्यमंत्र्यांकडे ट्विटरच्या माध्यमातून मागणी केली आहे .
      जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने 16 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद करमाड पोलीस स्थानकाच्या हद्दीत येथे घडली होती .डोंबिवली मोठागाव या परिसरातून दिवा वसई रेल्वे रूळ जातो हाच रुळ मार्ग सातपुल मार्गे भिवंडी बायपासला जोडला जातो. गेल्या अनेक दिवसापासून डोंबिवली व दिवा या भागातून काही परप्रांतीय मजूर शेकडोंच्या संख्येने या रेल्वे रूळावरून प्रवास करून भिवंडी बायपास मार्गे आपल्या गावाला जाण्याचा प्रयत्न करत आहेत .याबाबत स्थायी समितीचे माजी सभापती व नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त,पालिका आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असूनऔरंगाबाद येथे घडलेली घटना पाहता आपल्या इथे अशी दुर्दैवी घटना घड़ू नये यासाठी तातडीने आपल्याला प्रयत्न करण्याची गरज असून तडीने या मार्गावर जाणाऱ्या परप्रांतीय नागरिकांचा हा जीवघेणा प्रवास थांबविण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!