ठाणे

अंबरनाथ नगरपरिषद व इंदौर कॉम्पोझिटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या प्रयत्नाने वॉर्ड क्रं. ५७ मधील मोबाईल फिवर क्लिनिकमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबरनाथ दि. ११ (नवाज अब्दुल सत्तार वणू) : अंबरनाथ नगरपरिषद व इंदौर कॉम्पोझिटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वॉर्ड क्रं. ५७ चे स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ पूर्वेकडील जांभिवली गांव, जांभिवली पाडा, फणसीपाडा, ठाकूरपाडा, लोकनगरी गृहसंकुल आदी ठिकाणी “मोबाईल फिवर क्लिनिक” च्या माध्यमातून परिसरातील नागरिकांनी आरोग्य तपासणी करण्यात आली आणि मोफत औषधांचे देखील वाटप करण्यात आले. या तपासणी शिबिरात वॉर्ड ५७ मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या तपासणी दरम्यान सोशल डिस्टनसिंगची विशेष काळजी घेण्यात आली. अशी माहिती स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांनी दिली. याप्रसंगी कृष्णा पाटील, सुर्वे काका, मिलिंद मोरे, शीतल बांवधनकर तसेच सचिन पाटील यांचे सर्व सहकारी आदी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!