डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाच्या भितीपोटी अनेक परप्रांतीय मजूर पायपीट करत आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मजुरांच्या खाण्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब लक्षात येताच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून श्रीभैरव सेवा समिती आणि भिवंडी जैन सोशल युवा ग्रुपच्या सहकार्याने जेवणाची पाकीटे, दूध पावडर, ओआरएस, टोप्या, पाण्याच्या बाटल्या, मास्क आदी जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त सुनिल चव्हाण, अधीक्षक नितीन घुले, उपअधीक्षक हांडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यासाठी राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक सुजित कपाटे, विक्रांत जाधव यांच्यासह एस. डी पवार, एच. डी. खरबस, साळवे आदी जवानांनी विशेष मेहनत घेतली.
राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
May 13, 2020
91 Views
1 Min Read

-
Share This!
You may also like
Aapale Shahar
-
Share This!