डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाऊन मध्ये अनेक मजूर आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. शासने अश्या मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील अनेक शहरात अशी सोयही करण्यात आली आहे. परंतु अद्याप अनेक मजूर पायी चालत राज्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्या मजुरांसाठी नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सोय केली आहे. दोन खाजगी बसेस मधून सुमारे ७० मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिल्या.ह्या दोन्ही बसेस निर्जंतुकरन करून प्रत्येक मजुरांला मास्क आणि सेनेटराझर देण्यात आले. तसेच बसेस मधील प्रत्येक मजुरांच्या आरोग्य तपासणी अहवाल पाहूनच त्याला बसेस मध्ये प्रवेश देण्यात आला. नगसेवक कुणाल पाटील यांनी मजुरांना युपी , बिहार राज्यात जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून ट्रेन सोडण्यात यावी अशी मागणी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. सोनारपाडा, गोळीवली,द्वारली, पिसवली, दावडी, आडीवली यासह अनेक ग्रामीण व कल्याण पूर्व परिसरातील येथील मजूर नाईलासत्व आपल्या गावी जाण्यासाठी सायकल,ट्रक, तर चालत आपला जीव मुठीत घेऊन आपल्या राज्यात जात आहेत. या मजुरांना त्याच्या राज्यात जाण्यासासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून विशेष ट्रेन सोडण्यात यावी अशी मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांच्याकडे केली आहे. युपी, बिहार येथे जाण्यासाठी मजुरांनी सगळ्या परवानग्या घेऊन रजिस्टेशन देखील केले आहेत. त्यासाठी नगरसेवक पाटील यांनी मजुरांना आरोग्य तपासणी अहवालसाठी मदतही केली. त्याचप्रमाणे पावसाळयापूर्वी प्रभाग क्र.१०८ आडीवली -ढोकली मध्ये नालेसफाई व भूमिगत गटारांची साफ-सफाई करण्याबाबतची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे केली आहे.
नगरसेवक कुणाल पाटील यांनी स्वखर्चाने मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी केली सोय..
May 14, 2020
42 Views
2 Min Read

-
Share This!