डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे.नागरिकांना घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस दिवसरात्र बंदोबस्त करत आहे. अनेक शहरातील पोलिसांना त्यामुळे कोरोनाची बाधा झाली आहे. डॉ. राजेंद्र रिसबुड यांच्या स्मरणार्थ प्रेरीत होऊन डॉ. पूजा राजेंद्र रिसबुड , डॉ अमोघ राजेंद्र रिसबुड आणि संजय निकते व सहकार्यांनी करोना महामारीवर प्रतिबंधात्मक काम करणारे आर्सेनिक अल्ब ३० हे औषध ठाणे आणि डोंबिवली विभागातील सर्व पोलीस बांधवांना देण्यात आले. त्याचप्रमाणे पत्रकार आणि त्यांच्या परिवाराकरिता सुद्धा हे औषध देण्यात आले. हे औषध प्रत्येकाने घेऊन आपली प्रतिकारक्षमता वाढवावी. त्याचबरोबर मास्क, फेस शील्ड यासारख्या, बाह्य संरक्षण देणाऱ्या वस्तूंचा वापर करून या महामारीवर मात करायला सज्ज व्हावे. मदत लागल्यास अवश्य संपर्क करावा ,आपण विजय मिळवू शकतो असे डॉ. पूजा राजेंद्र रिसबुड , डॉ अमोघ राजेंद्र रिसबुड यांनी सांगितले. श्रीपाद जोशी, मंदार कुलकर्णी, नितिन डेगवेकर, संजय निकते , धनंजय थिटे, विजय टोकरे ,केतन कोलगे आणि डॉ. सीमा ओक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अधिक माहितीसाठी डॉ. पूजा राजेंद्र रिसबूड. (A.M) डोंबिवली 9920094276 आणि डॉ. अमोघ राजेंद्र रिसबूड. (M.P.Th) डोंबिवली . 9769994286 वर संपर्क साधावा.
ठाणे आणि डोंबिवलीतील पोलीस बांधवाना उपयुक्त होमिओपथिक ओषधांचे वाटप
