ठाणे

खाजगी कोरोना कोव्हीड 19 घोषित रुग्णालयांमध्ये महापालिका लावणार निश्चित केलेल्या दरांचा तक्ता – आयुक्त विजय सिंघल

   ठाणे (16 मे, संतोष पडवळ ) :  ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या खाजगी कोरोना कोव्हीड 19 रुग्णालयांनी महापालिकेच्यावतीने निश्चित करण्यात आलेल्या दराचा तक्ता रूग्णालयाच्या दर्शनी भागांवर लावण्यासंदर्भात पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या वतीनेदरपत्रकाचा तक्ता लावण्याचा निर्णय घेतला आहे.
कोव्हीड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यानुषंगाने उपाययोजना निश्चित करण्यासाठी काल आयोजित बैठकीत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी खाजगी रुग्णांलयांनी रेट कार्ड डिस्प्ले करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी सर्व खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिला. राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८२७ दिनांक १३ मार्च, २०२० पासून लागू केला आहे. या अधिनियमाच्या खंड २(१) नुसार महाराष्ट्र कोविड – १९ उपाययोजना नियम २०२० मधील नियम क्र.३ अन्वये महानगरपालिका क्षेत्रात रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शहरातील खाजगी रुग्णालये कोव्हीड 19 रुग्णालये म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली आहेत.
 ठाणे शहरातील नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत, याकरिता या कोरोना कोव्हीड 19 घोषित रुग्णालयात बाधित रुग्णाला तात्काळ कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी ठराविक दर निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या सामान्य नागरिकांना हे दर माहिती व्हावेत, उपचारासंबंधित दरात फसवणूक होवू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने ठरवण्यात आलेले रेट कार्ड खाजगी कोव्हीड घोषीत रुग्णालयांच्या व्यवस्थापकांनी 24 तासात डिस्प्ले करण्याच्या कडक सूचना महापालिका आयुक्त श्री. सिंघल यांनी दिल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!