डोंबिवली ( शंकर जाधव ) : लॉकडाउन काळात रस्त्यावरचे भटके कुत्रे आणि मांजरांचे हाल होऊ नये यासाठी डोंबिवलीतील ‘साथी फाऊंडेशन’ गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. मुक्या प्राण्यांचे हाल होऊ नये म्हणून डोंबिवलतील आकाश वेदक या तरुणाने पुढाकार घेत ही साथी ( SAATHI – SUPPORT ANIMALS AND TREES FOR HEALTHY INDIA) फाऊंडेशनची स्थापना केली असून अमन सोनी (Jain) आणि धवल सोनी या मित्रांचीही या संस्थेला साथ लाभत आहे. सुरुवातीचा काळात स्वतःच्या खर्चातून डॉग फूड विकत घेऊन परिसरातील भटक्या कुत्र्यांना खायला दिले जात होते. त्यानंतर या तरुणांनी नातेवाईक तसेच इतर मित्र परिवाराला यासाठी आर्थिक मदतीसाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले. ज्यातून थोडाफार आर्थिक निधी उभा झाला आणि पुढील काही दिवसांत आम्ही हळूहळू डोंबिवलीत वेगवेगळ्या परिसरात आमचे स्वयंसेवक नेमल्याचे आकाशने सांगितले. आजमितीस या ३० स्वयंसेवकांमार्फत डोंबिवली, ठाकुर्ली, दिवा परिसरात दररोज ५०० हुन अधिक श्वानांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ९५० किलो डॉगफूडचे वाटप करण्यात आले असून यासाठी १३० हुन अधिक प्राणीप्रेमीनी आर्थिक सहाय्य केल्याचे सांगण्यात आले..आपल्या परिसरातील भटक्या प्राण्यांच्या खाण्याच्या व्यवस्थेसाठी आकाश वेदकशी या ९९३००१३९२६ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुक्या प्राण्यांसाठी डोंबिवलीतील ‘साथी फाऊंडेशन’ चा पुढाकार..
May 20, 2020
67 Views
1 Min Read

-
Share This!