डोंबिवली ( शंकर जाधव ) : करोनाच्या विरोधात मदतीचा हात हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून संचारबंदिच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शिवसेना नेते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, कोपर शिवसेना शाखेचे पदाधिकारी, महिला शिवसैनिक यांनी रेशनकार्ड आणि मतदार यादीत नाव नसलेल्यांना कोपर शिवसेना शाखेकडून मदतीचा हात दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनानुसार कोपर आणि डोंबिवली परिसरात हातावर पोट भरणारे अनेक नागरिक विविध चाळी आणि वस्त्यांमध्ये राहत आहेत.या नागरिकांकडे रहिवासी म्हणून कोणताही पुरावा नसल्याने करोना संकटकाळात सरकारी किंवा इतर मदतीपासून वंचित राहवे लागू नये यासाठी अन्नधान्य वाटपकरण्यात आले.शिवसेना कोपर शाखा क्र ६५ च्या वतीने माजी परिवहन सभापती संजय लक्ष्मण पावशे यांनी कोपर आणि डोंबिवली परिसरातील जे नागरिक रेशनिंग कार्ड किंवा मतदार यादी पासून वंचित आहेत त्यांचा सर्वे करुन त्यांना तांदूळ गहू, बटाटा, डाळ, पिठ, तेल इत्यादी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप केले. या परिसरात रिक्षाचालक, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात काम करणारे, दुकानात काम करणारे श्रमिक राहतात अश्या श्रमिकांना गावी जाण्यासाठी शाखेच्या माध्यमातून पोलीस परवाना किंवा वैद्यकीय तपासणी साठी सहाय्य करण्यात आले.रितसर आनलाईन अर्ज भरण्यासाठी शाखेत सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून जागा उपलब्ध करुन देण्यात आली.उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार पश्मिम बंगाल येथे जाणाऱ्या सुमारे २००० श्रमिकांनी येथून अर्ज भरून दिले.त्याचप्रमाणे ५००राज्यातंर्गत प्रवास करणाऱ्या कुटुंबाना देखील कोपर शाखेच्या वतीने परवाना मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आली.खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोपर शिवसेना शाखेस रुग्णावाहिका दिली आहे. या रुग्ण वाहिकेचा उपयोग करोनासंकट काळात करण्यात आला. विशेषतः गंभीर रुग्ण, गरोदर स्त्रिया यांना मदत करता आल्याचे संजय पावशे यांनी सांगितले. कोपर शिवसेना शाखेत युवकांची संख्या वाढत चालली आहे.युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ” युवा आयकान ” प्रतिमा कारणीभूत असल्याचे पावशे म्हणाले.