कल्याण दि. 21 :शासनाने कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करून अनेक निर्बंध जाहीर केले.
त्यानुसार 235 सभासद असलेल्या अंदाजे 1000 लोकसंख्या असलेल्या सुमेरू टॉवर संकुलातील सर्वाना कोणताही प्रादुर्भाव होवू नये म्हणून सोसायटीच्या संचालक मंडळाने काही कडक निर्बंध लावून व अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या.सोसायटी मध्ये बाहेरील व्यक्तीस प्रवेश देणे बंद केले त्यासाठी एकच गेट चालू ठेवण्यात आले मुख्य प्रवेशद्वारावर हॅन्ड वॉश व सॅनिटायझर उपलब्ध केले.
रहिवाशांना बाहेर जावू न देता त्याना भाजीपाला व फळे, दूध, ऑनलाईन किराणा व औषध यांची सोय उपलब्ध करून दिली.
बँकांच्या व्यवहारसाठी मोबाईल एटीएम सुविधा उपलब्ध केली.महापालिका यांना संपर्क करून सर्वांच्या आरोग्याचा सर्व्ह केला.
अनेक वेळा फवारणी करून घेण्यात आली.सोसायटी कडून जास्तीत जास्त स्वच्छता ठेवण्यात आली
आठवड्यातुन दोन वेळा प्रत्येक मजल्यावर फवारणी केली.
प्रतिबंध रोखण्यासाठी लिफ्ट मध्ये कागदी चिठ्ठ्या ठेवण्यात आल्या सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचारी यांची विशेष काळजी घेण्यात आली. प्रत्येक सभासद व घरातील सर्वांचे थर्मल स्क्रीनिग temperature मोजणी केली.
वरील निर्बंध व उपाययोजना यामुळे ही सोसायटी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकली.सभासदांनी पाळलेली शिस्त यामुळे आपण यशस्वी झालो आहोत परंतु अजूनही धोका कमी झालेला नाही.
अनेक व्यक्तीना अडचणी आल्या असतील परंतु कठीण काळामध्ये अपणासामोर पर्याय नाहीत
आपल्या आजूबाजूच्या सोसायटी मध्ये रुग मिळत आहेत तेव्हा आपण सतर्क राहणे गरजेचे आहेत.
त्यामुळे याअगोदरचे सर्व नियम लागू राहतील.
सुमेरू टॉवर लोकधारा होऊसिंग सोसायटी, कॉम्प्लेक्सचा कल्याण पूर्व या सोसायटी नागरिक लावलेली शिस्तबद्धता कोरोना विषाणू रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनाचा सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यापुढे ही सर्वानी सहकार्य करावे ही असे आवाहन संचालक मंडळाचे सचिव रविंद्र दरेकर यांनी केले आहे.