डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना यावर नियंत्रण मिळवण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचे सांगत राज्यात विविध ठिकाणी कार्यालयाच्या- घराच्या अंगणात ” मेरा आंगण—मेरा रणांगण` भूमिका घेत काळ्या फिती लावून भाजपने आंदोलन केले.डोंबिवलीतील भाजप नगरसेवक विश्वजित पवार आणि कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती लावून आणि महाविकास विकास आघाडीचा निषेध नोंदविणारे फलक हाती घेऊन महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.
या आंदोलनात सुशील भावे, अनघा पवार, भिडे काकू,अपर्णा सुरंजे, श्रद्धा पवार, बाला मिस्त्री दिवेबाई,अशोक हळदिवे,आशिष अहिरे, वंदना गोडबोले, अश्विनी, अक्षय पवार म गणेश पाटील यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवून आंदोलन करण्यात आले.यावेळी नगरसेवक विश्वजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे फेल गेल्याने आंगण तेथे रंगागण असे आंदोलन केले आहे.राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हे सरकार यावर का नियंत्रण मिळवू शकत नाही याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोना चाचणी रिपोर्टसाठी ३००० हजार रुपये आकाराने म्हणजे ही लूटच म्हणावी लागेल.तर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हि उप्चारासाचा खर्च जास्त आहे.सामान्य नागरिकांना रेशांनिग दुकानात धान्य मिळालेच पाहिजे. पण डोंबिवलीत अनेक रेशनिंग दुकानात गरीब नागरिकांना धान्य मिळत नाही.