दिवा (ता 22 मे, संतोष पडवळ ) – कोरोनाच्या अधिक गडद होणाऱ्या या संकटाला ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारा बाबत निषेध करण्यासाठी दिव्यातील भाजपाच्या नेत्यांनी काळे घोषणांचे फलक हातात घेऊन निषेध केला.
सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने ‘आंगण हेच रणांगण’ हे आंदोलन सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित, काळे कपडे आणि काळ्या गोष्टी वापरत सरकार विरोधात निषेध करण्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल फेसबुकच्या माध्यमातून दिली होती.
मुंबई – ठाण्याबरोबर दिव्यातही कोरोना रुग्णांची दरदिवशी संख्या वाढत आहे. मात्र या संकटामध्ये ठाकरे सरकार नियोजन करण्यात निष्फळ ठरत असल्या मुळे आज भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. त्यात दिव्यातील भाजपाच्या नेत्यांनी व अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करून घराच्या अंगणात काळे कपडे घालून हातात काळे घोषणांचे फलक घेऊन शासनाचा निषेध केला. यावेळी आदेश भगत, भाजपा अध्यक्ष, दिवा शीळ मंडळ, निलेश पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, ठाणे जिल्हा, सचिन भोईर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, दिवा शीळ मंडळ, सौ. अर्चना पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा, दिवा शीळ मंडळ, विजय भोईर, रोहिदास मुंडे,रोशन भगत, प्रकाश पाटील, कल्पेश सारस्वत आदी कार्यकर्त्यांनी काळे मास्क लावून, काळे कपडे घालून निषेध केला.
photo gallery :……………………………………………………………………….



