कार्यालयाबाहेर `अंगण ते रणांगण`आंदोलन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : ‘आंगण ते रणांगण’ या शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत .भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी हातात फलक घेऊन कार्यलयाबाहेर सोशल डिस्टनसिंग राखत आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवला .यावेळी आमदार नरेंद्र पवार यांनी कोरोना विषाणूच्या मुक्तीसाठी गेल्या 3 महिन्यापासून राज्य सरकारने कोणतेही ठोस धोरण अवलंबले नाही. स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड सुरू आहे, राज्यभरात शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, राज्यातील गरिबांना रेशनधान्य मिळत नाही, उलट त्यामध्ये घोटाळे सुरू आहेत. यासोबतच राज्यातील आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे, सातत्याने रुग्णसंख्या लपविली जात आहे, कोरोनाने बाधित मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप भाजप चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला . राज्यातील ११ कोटी जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही करावी आणि लोकं रस्त्यावर तरफडून मरत आहेत आतातरी घराबाहेर पडून कारभार करावा अस आवाहन करत भाजपा प्रदेश सचिव नरेंद्र पवार यांनी निषेध व्यक्त केला. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह आमदार गणपत गायकवाड, आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील कार्यलय आणि घराबाहेर उभे राहून आंदोलन केले.