नवी मुंबई : तळोजा येथील कारागृहात एका कैद्याने पहाटेच्या सुमारास शौचालयात चादरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बालू गडसिंगे असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
गडसिंगे याने पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. गडसिंगे याच्यावर ४ ते ५ गुन्ह्याची नोंद असून तो न्यायबंदी होता. त्याच्यावर माजलगाव आणि शिवाजीनगर अशा ठिकाणीसुध्दा गुन्हे दाखल आहेत. तो खुनाच्या आणि मारहाणीच्या गुन्ह्याखाली २०१७ पासून शिक्षा भोगत होता.
गेल्या वर्षी त्याला कल्याणच्या कारागृहातून तळोजा कारागृहात हलवले होते. तो स्वभावाने रागीट होता. त्यामुळे त्याचे इतर कुणा कैद्याशी पटत नसल्याने त्याला कारागृहाच्या विशेष कक्षात ठेवले होते. त्याने बंदिस्त असलेल्या शौचालयाच्या खोलीतील खिडकीच्या गजाला चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.