ठाणे

कोव्हीड संशयित रूग्णांस दाखल करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर होणार कायदेशीर कारवाई – महापालिका आयुक्तांचा इशारा

 ठाणे (30 मे, संतोष पडवळ )  :  शहरातील नॅान कोव्हीड खासगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड संशयित रूग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच रूग्णालयाच्या संचालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे.
            कोणतेही रूग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देवू शकत नाही असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कोव्हीड संशयित सिमटोमॅटीक रूग्णांना खासगी नॅान कोव्हीड रूग्णालयात दाखल करून घेणेबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे.
            या आदेशानुसार शहरातील नॅान कोव्हीड रूग्णालयांनी कोव्हीड संशयित रूग्ण दाखल झाल्यास त्याच्या प्रकृती स्वाथ्यानुसार आणि रूग्णालयात दाखल करून घेण्याची आवश्यकता असल्यास आयसोलेशन वॅार्डमध्ये दाखल करून घ्यावे. सदर रूग्णावर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आश्यकता वाटली तर त्याचे स्वॅब कोरोना कोव्हीड तपासणीकरता मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठविण्यात यावेत. संबंधित रूग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यास तो रूग्ण ज्या रूगणालयात दाखल आहे त्याच रूग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात यावेत. तथापि त्याचा तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यास त्यास पुढील उपचारासाठी कोव्हीड रूग्णालयात दाखल करण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
            कोव्हीड संश्यित रूग्ण कोणत्याही नॅान कोव्हीड रूग्णालयामध्ये उपचारासाठी आल्यास प्रथम त्यास ट्रायेज एरियामध्ये (Triage Area) दाखल करून घेण्यात यावे. आवश्यकतेप्रमाणे पीपीई किटस् आणि इतर सुरक्षित किटसचा वापर करून त्याच्यावर उपचार करण्यात यावेत असे स्पष्ट करून श्री. सिंघल यांनी एखाद्या खासगी रूग्णालयाने रूग्णास दाखल करून उपचार करण्यास नकार दिल्यास अथवा सदर रूग्णास इतर रूग्णालयामध्ये पोहोचण्यास विलंब झाल्यास अथवा त्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास अशा रूग्णालयांविरूद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल तसेच रूग्णालयांच्या संचालकांविरूद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!