डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये पालिका प्रशासन जोरदार काम करत असताना दुसरीकडे नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याचा आरोप प्रशासनावर होत आहे.पावसाळा तोंडावर आल्याने नालेसफाईवरही पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे असे सांगत सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे आणि डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेंद्र ठोके,आनंद जावळे आणि राजू काकडे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.नालेसफाई वेळेवर आणि व्यवस्थित झाली नाही साथीचे रोग पसरण्याची शक्यताहि साळवे यांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यापूर्वी सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी ; वंचित बहुजन आघाडीची मागणी
June 2, 2020
41 Views
1 Min Read

-
Share This!