ठाणे

प्रशासनाचा कचरा विलगीकरण उपक्रम की शहरभर कचरा कार्यक्रम… मनसे जिल्हा सचिव प्रकाश माने यांचा प्रश्न..

 डोंबिवली ( शंकर जाधव )  : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने  चरा विलगीकरणाचा अनोखा उपक्रम हाती घेताना दिसत आहे. जगभर कोरोना आजाराने महामारी पसरली असताना कचरा विलगीकरणाला कल्याण-डोंबिवली महापालिका या कालावधीतच एवढं मोठं महत्त्व का देते याबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.पालिका प्रशासनाने कचरा विलीगकरण सक्तीचे केले असले तरी यावर नागरीक गांभीर्याने विचार करत नसल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेने काही महिन्या पूर्वीच नव्याने विकत घेतलेल्या कचराकुंड्या महापालिकेतील आरोग्य विभागाच्या उपायुक्तांच्या  आदेशाने काढण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग आपणास पहावयास मिळत आहेत. त्यामुळे शहरभर दुर्गंधीचे साम्राज्य देखील निर्माण झाल्याचे जाणवत असल्याचे मनसे सचिव जिल्हा सचिव प्रकाश माने यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाचा कचरा विलगीकरण उपक्रम की शहरभर कचरा कार्यक्रम असा प्रश्न माने यांना पडला आहे. सर्व प्रकारचा एकत्रित असलेल्या कचरा उचलण्यात महापालिका कर्मचारी नकार देत आहेत. त्यामुळे नागरिक नाईलाजास्तव हा कचरा विविध ठिकाणी उघड्यावरच टाकत आहेत. शहरातील पूर्वी कचरा कुंड्या असलेल्या ठिकाणां जवळ मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले आपल्याला पहावयास मिळत आहे.

 

मनसे सचिव जिल्हा सचिव प्रकाश माने म्हणाले,  नागरिकांना कचरा वेगळा करण्याची सवय लागावी म्हणून हा उपक्रम आम्ही राबवित आहोत असे उपायुक्त असतात. भविष्यात आपण जगू किंवा मरू याबद्दल देखील लोकांच्या मनात साशंकता निर्माण झाली असताना आणि आर्थिक दृष्ट्या देखील सर्वच घटकातील लोक दुर्बल झाले असताना लोकांना अशाप्रकारे प्रकारचे बंधन घालणे व आर्थिक दंड आकारणे योग्य नाही.माझी विनंती आहे की कचरा विलगीकरण उपक्रमांमध्ये अशाप्रकारे नागरिकांना वेठीस न धरता नवी मुंबई महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेमध्ये कचरा विलगीकरण कशा पद्धतीने करण्यात येत आहे याबाबत माहिती घेऊनच कोरोनाचा हा अति-गंभिर आजार कमी झाल्यानंतरच कचरा विलगिकरण उपक्रम राबवावा. पाऊस सुरू झाल्यावर महापालिका प्रशासनाने ओला आणि सुका कचरा वेगळा कसा करतील.  त्याबद्दल त्यांनी कोणत्या प्रकारचे नियोजन केले आहे का ?  यामुळे कोरोनापेक्षा देखील डेंग्यू, मलेरिया आणि इतर गंभीर आजारांमुळे मोठ्या प्रमाणावर महामारी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा हट्ट काही महिने बाजूला ठेवून महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याबाबत सर्वप्रथम विचार करावा आणि चार-सहा महिन्यांनंतर त्यांच्या मनातील हा निसर्गाचा समतोल राखणारा उपक्रम राबविण्याबाबत त्यांनी अट्टाहास करावा अन्यथा त्यांचा हा अट्टाहास नागरिकांच्या जीविताशी खेळण्या सारखाच आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!