ठाणे प्रतिनिधी (मिलिंद जाधव ) : कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन असल्याने आपतकालिन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील गोरगरीब, निर्वासित, तळहातावर कमवणाऱे मजुर, बेघर असलेले कुटूंब यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. म्हणून असंघटित कष्ट्करी कामगार संघटनेच्या माध्यमातून कोरो सामाजिक संस्थेच्या मदतीने
तृतीयपंथी समूह , गवंडी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला ,अपंग वर्गाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप खेमणी, सुभाष नगर अंबरनाथ, उल्हासनगर पाच नंबर ,हनुमान नगर विठ्ठल वाडी येथे २०० नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सुनील अहिरे, मीरा सपकाळे राहुल पवार वैशाली कांबळे, अर्चना शेख, श्री जगताप, संजना जाधव उपस्थित होत्या.