डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनोच्या महामारीत रक्तपेढीत रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्याआवाहनानुसार डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहरशाखेच्या माध्यमातून व चिदानंद चेरीटेबल ट्रस्ट ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर भरविण्यात आले होते.या रक्तदात्यांनी या शिबिरात उपस्थित दाखवून उत्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी १५० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुखतथा रायगड जिल्हासंपर्क प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक तात्या माने, महिला पदाधिकारी कविता गावंड, माजी नगरसेविका मंगला सुळे,विवेक खामकर,किशोर मानकामे, विभाग प्रमुख अमोल पाटील, संजय पावशे, विभागप्रमुख कुणाल ढापरे, तुषार शिंदे, किरण पाटील, रमेश कदम, उपविभागप्रमुख अभय घाडीगावकर, ममता घाडीगावकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहरप्रमुख तथा परिवहन समितीचे माजी सदस्य संतोष चव्हाण,उपविभागप्रमुख किशोर सोहनी, तेजस सावंत,कवटणकर यांनी अथक मेहनत घेतली.
डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद
June 4, 2020
41 Views
1 Min Read

-
Share This!