डोंबिवली ( शंकर जाधव ) : पावसाला सुरु झाला असून चाळीतील अनेक नागरिकांना आपल्या घरात पाणी शिरण्याची भीती असते. २०१९च्या पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षी अश्याच परिस्थिती हाल होणार का असा प्रश्न चाळकऱ्यांना सतावित आहे. गोर गरीब जनतेसाठी अडचणीच्या वेळी सदैव धावून येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होऊ नये म्हणून जनतेच्या सेवेला तत्पर असताना दुसरीकडे चाळकरी नागरिकांना पूरपरिस्थितीत त्रास हाऊ नये म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा अध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश गोपिनाथ भोईर, स्थायी समिती सदस्या तथा नगरसेविका सरोज प्रकाश भोईर ह्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ५१, ५२ आणि ५६ म्हणजेच उमेश नगर, महाराष्ट्र नगर, गावदेवी नवागाव, देवीचा पाडा, गोपीनाथ चौक येथे स्वतः उपस्थित राहून पालिकेच्या नालेसफाई करून घेतली. यावेळी माजी उपविभाग अध्यक्ष संदिप (रमा) म्हात्रे, मनविसे शहर सचिव प्रितेश म्हामूणकर, समीर चाळके आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. गटार ज्या नाल्यात जोडतात तो जगदंबा मंदिर परिसरातील मोठानाला त्याची सफाई स्वतः तिथे उभे राहून पालिका प्रशासनाकडून नालेसफाई करून घेतली.नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर हे दरवर्षी विभागातील नागरीकांची व स्वच्छतेची विशेष काळजी घेत असल्याने नागरिक त्यांच्या कार्याची पोचपोवती देत त्यांना जनतेच्या सेवेसाठी नगरसेवक म्हणून निवडून आणत आहेत. चालू असलेलं काम ज्या गतीने पुढे सरकत आहे ते पाहून विभागातील नागरिकांनी मनसेचे आणि नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांचे आभार मानले.
मनसे नगरसेवक प्रकाश भोईर आणि नगरसेविका सरोज भोईर यांच्या पाठपुराव्याने नालेसफाईचे काम सुरु..
June 4, 2020
104 Views
2 Min Read

-
Share This!