डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद म्हणून भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडलकडून लोकनेते स्व. गोपिनाथजी मुंडे स्मृती दिनानिमित्त राज्यातील रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांतजी कांबळे, माजी उपमहापौर मोरेश्वरजी भोईर, मंडल अध्यक्ष नंदूजी जोशी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते स्व. गोपिनाथजी मुंडे ह्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम व आरोग्य विषयक योग्य ती काळजी घेऊन शिबिराचे आयोजन सुलभ व्हावे या साठी गुगल फॉर्म लिंक द्वारे रक्तदात्यांची पूर्व नावनोंदणी करण्यात आली होती. चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता रक्तदात्यांसाठी रिक्षा व्यवस्था करण्यात आली होती. माजी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्रजी चव्हाण ह्यांनी देखील उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप केले.सर्व रक्तदात्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम ३० ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेविका खुशबू चौधरी ह्या पदाधिकाऱ्यांनीहि रक्तदान केले.रक्तदान शिबिराचे प्रमुख म्हणून श्रेयस मानकामे आणि सहप्रमुख म्हणून भूषण देव ह्यांनी काम पाहिले. भारतीय जनता युवा मोर्चा, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मिहिर देसाई यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.
लोकनेते स्व. गोपिनाथजी मुंडे स्मृती दिन निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
June 4, 2020
26 Views
1 Min Read

-
Share This!