अनुभुती संघटनेकडून मदतीचा हात
ठाणे ( प्रतिनिधी मिलिंद जाधव ) : कोरोना विषाणुचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या आपल्या राज्यात संचारबंदी व
लॉकडाऊन असल्याने आपतकालिन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील गोरगरीब, निर्वासित, तळहातावर कमवणाऱे मजुर, बेघर असलेले कुटूंब यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. म्हणून ‘अनुभुती संघटने’ च्या वतीने बंजारा, घिसाडी, पारधी, नाथपंथी डावरी गोसावी,मुरळी ,गवळी आदिवासी, ठाकर, कातकरी
या समूहातील कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून व आर्थिक सहाय्य करून अनुभुती संघटनेने मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
महाराष्ट्रातील १६ जिल्हातील विविध दुर्गम भागातील भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना यावेळी गहू, तांदूळ,साखर,चहापावडर,हळद,मीठ, तेल, मसाला, चवळी, तूरडाळ, साबण तर आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून ‘अनुभुती संघटनेने’ एकूण २३०० जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप केले आहेत. तर २०० कुटूंबाना प्रत्येकी ३००० रुपये आर्थिक मदत देऊन भटक्या विमुक्त समाजातील गरीब कुटूंबाना दिलासा दिला आहे. यावेळी माक्स बांधून व सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भटका विमुक्त समाजातील नागरिक मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. त्यांना सक्षम कसं करता यावं याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करत असून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर लॉकडाऊन असल्यामुळे मानसिक आरोग्यासाठी आनलाईन समुपदेशन सुरू ठेवले आहे. असे अनुभुती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपा पवार यांनी बोलताना सांगितले.
सदर उपक्रमात अनुभुती संघटनेचे अध्यक्षा दीपा पवार, सामाजिक कार्यकर्त्या अमरिता दे, स्वयंसेवक गणेश साळुंखे तर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Attachments area