डोंबिवली ( शंकर जाधव ) : माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका विद्या राजेश म्हात्रे व भाजप कल्याण जिल्हा सहचिटणीस राजेश बामा म्हात्रे त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र.५९ `कान्होजी जेधे मैदान` येथील नागरिकांना डॉ.सोनल राजेश जाधव यांच्या मार्फत तयार केलेल्या ‘`आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप केले. नगरसेविका विद्या म्हात्रे व राजेश बामा म्हात्रे यांच्या माध्यमातून वॉर्ड ५९ मधील ओम वृदावन सोसायटी तील गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य करण्यात आले. ओम वृदावन रहिवासी संघाने या मदतीसाठी त्यांचे आभार मानले.
भाजप नगरसेविका विद्या म्हात्रे यांच्यावतीने ‘ आर्सेनिक अल्बम ३०’ होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप
June 5, 2020
98 Views
1 Min Read

-
Share This!