ठाणे

अनलॉकच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीत  सोशल  डिस्टन्सिंगचा फज्जा

 मोटरसायकल आणि रिक्षातही मास्क न वापरता प्रवास

 डोंबिवली ( शंकर जाधव )  : सोमवार ८ तारखेपासुन राज्य सरकारने खाजगी कार्यालये अनलॉक १ मधील ‘मिशन बिगीन अगेन अंतर्गत सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र डोंबिवलीत अनलॉकच्या पहिल्या दिवशी डोंबिवलीत  सोशल  डिस्टन्सिंगचा फज्जा उडला. मोटरसायकलवर आणि रिक्षातही मास्क न वापरता प्रवाशी प्रवास करत होते.पोलीस आणि  पालिका प्रशासन या परिस्थितीवर शांत बसून होते.             खासगी कार्यालये सुरू सुरु झाल्याने त्यामुळे कामावर जाण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी वर्ग घराबाहेर पडले. डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकात चाकरमान्यांसाठी एसटीची सोय करण्यात आली होती.परंतु प्रवाश्यांनी सोशल डिस्टींग न ठेवता जवळजवळ उभे राहून गर्दी करत रांगेत उभे होते.एसटी मध्ये गर्दी झाल्याने चालक आणि वाहन चिंतेत होते.तर मोटरसायकरस्वरांनी मास्क न वापरता तिघे जन बसून प्रवास करत होते.तर रिक्षाचालकांनी सरकारच्या या आदेशाला न मानता सर्रासपणे चार प्रवाशी बसवत होते. प्रवाश्यांनी मास्क वापरणे बंधनकारक असताना रिक्षाचालक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होते.दुकानातही तोच प्रकार सुरु होता. दुकानदार मास्क न वापरता  ग्राहकांना सोशल  डिस्टन्सिंगचे पालन करत समान देत होते. या सर्व परिस्थितीकडे पोलीस आणि पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असताना दिसले.डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्ण वाढण्याची भीती असताना पोलीस आणि प्रशासनाने अश्या प्रकारे लक्ष न देणे आणि ननागरिकांनी सरकारच्या आदेशाचे पालन न करणे हे फारच भयानक परिस्थिती निर्माण करू शकते .

 

रिक्षाचालकांची लुट सुरूच..

लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरे बसणारे नागरीक सोमवारपासून घराबाहेर पडले.याचा फायदा काही मुजोर रिक्षाचालकांनी घेत रिक्षाभाडेवाढ  जाहीर न होताच मनाला वाटेल तेवढे भाडे आकारात होते. ज्या प्रमाणे रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला आहे, त्याचप्रमाणे आपल्या रिक्षात बसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसल्याचे भान अश्या काही मुजोर रिक्षाचालकांना राहिले नसावे अश्या प्रतिक्रिया प्रवाश्यांनी दिल्या.रिक्षायुनियनने यावर मौन बाळगल्याने रिक्षायुनियने अश्या परिस्थिती प्रवाश्यांची आर्थिक परिस्थितीचा विचार करावा अशी मागणी होत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!