ठाणे

अपुऱ्या बस सेवेमुळे दिवा शहरातील नोकरदार वर्ग दोन दोन तास बसच्या रांगेत

ठाणे :  कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेले ठाणे हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे.अनलॉकचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे,सर्व कार्यालये आणि मंदिरासह बाजारपेठा देखील उघडण्यास सुरवात झाली असतना सोमवारी  सकाळी मुंबई च्या दिशेने कामानिमित्त जाणाऱ्या  नोकरदार वर्गाची प्रचंड वर्दळ पाहण्यास मिळाली.नेहमीच उपेक्षित असलेले ठाणे मनापातील दिव्यात लोकल सेवा संपूर्ण पणे बंद असल्याने व अपुऱ्या बससेवेमुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहे . दिवा रेल्वे परिसरातील चाकरमान्यांची काल पासून गर्दी उसळलेली दिसून आले. पहाटे साडेचार वाजल्यापासून बस पकडण्यासाठी बसच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या.परंतु बससेवेच्या अपुऱ्या संख्ये मुळे राज्य सरकारने केलेल्या उपाय योजनांचा पुरता फज्जा उडाला. शहरातील अर्थचक्र  पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यसरकार आग्रही आहे.मात्र सोमवारी सकाळी होणारी गर्दी लक्षात घेता संबंधित प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक  असताना त्या संदर्भात आवश्यक ती पाउले उचलण्यात आली नसल्याने त्याचा मोठा फटका दिव्यातील नोकरदार वर्गाला बसला आहे.दिवा परिसरात मुंबई आणि ठाणे या ठिकाणी खाजगी आणि सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.दिवा शहर मुख्य रस्त्याच्या आडबाजूला असल्याने इतर उपनगरा पेक्षा दिवा शहरातील अडचणी वेगळ्या आहेत .मुख्य रस्त्या पासून दिवा शहरात येण्यासाठी मोठा वळसा मारून शिळफाटा  येथून रस्ता आहे परंतु या रस्त्याची अवस्था बिकट आहे.दिवा वासियांना मुंबई ठाणे या ठिकाणी येण्यासाठी सर्वात जलद व सर्वात स्वस्त पर्याय हा रेल्वेसेवेचा असल्याने त्यांना रस्ते मार्गे मुंबई गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे अथवा ठाणे शहरात येऊन पुढे मुंबई गाठण्यासाठी बस  बदलणे हा पर्याय असून तो वेळकाढू पणा आणि खर्चिक असल्याने नोकरदार वर्गाने कामावर कसे जायचे हा प्रश्न दिवा वासीय विचारात आहे.या  कल्याण डोंबिवली वरून नवीमुंबई वरून ठाणे मुंबई गाठण्यासाठी अनेकांनी खाजगी वाहनांचा पर्याय निवडल्याने कल्याण शिळ मार्गावर  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत होते.

प्रवास एक तासाचा असला तरी बस पकडण्यासाठी दिवेकर दोन तास रांगेत उभे असतात आणि खासगी वाहने अव्वlच्या सव्वा भाडे आकारत असल्याचे चित्र दिसून आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!