डोंबिवली ( शंकर जाधव ) : सर्वत्र लॉकडाऊन मूळे शाळा सुरु होण्यास अनेक दिवसांचा अवधी असल्याने या कालावधीत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये या उद्देशाने ‘ई लर्निंग स्कूल’चा फॉर्मुला कुणाल पाटील फाऊंडेशन आणि औक्सीलियम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. या ई लर्निंग स्कूलचे उद्घाटन नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यू.के.जी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चर्स सुरु केले असून याला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत ई -स्कूल मध्ये ५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यासाठी इंग्लिश, मराठी, हिंदी, गणित व विज्ञान ह्या विषयासाठी ५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ई लर्निंग स्कूल साठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून विनामुल्य आहे. झूम अॅप द्वारे हे ऑनलाईन वर्ग घेण्यात येत आहेत.सध्या लॉकडाऊन मुळे शाळा आणि विद्यार्थी यांचा संपर्क होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये कोणते ही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला असून त्याला विद्यार्थ्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांना या ई लर्निंगस्कूलचा लाभ घ्यायचा असल्यास ९६८९१५३८०२,९५६१८५७३०२ या क्रमांकावर संपर्क करावा.
कुणाल पाटील फाऊंडेशन आणि औक्सीलियम हॉस्पिटलचे विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य ‘ई लर्निंग स्कूल’….
June 10, 2020
20 Views
1 Min Read

-
Share This!