ठाणे

डोंबिवली स्थानकातील आरक्षण खिडकी बंदच … आरक्षणाच्या  प्रतीक्षेत नागरिक

डोंबिवली  ( शंकर जाधव )   : डोंबिवली स्थानकात रेल्वेची आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना रेल्वेचे आरक्षणाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

 कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संचारबंदी जाहीर केल्यानंतर रेल्वे देखील बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने  अनेक रेल्वे स्थानकात आरक्षण खिडकी सुरू करण्याचे निर्देश दिले. मात्र अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाला तरी देखील डोंबिवली स्थानकातील आरक्षण  खिडकी बंद असल्याचे  दिसून आले.

    डोंबिवली  शहरात महाराष्ट्रातील कोकण, जळगाव, सातारा, कोल्हापुर येथील अनेक नागरीक राहतात. या शिवाय उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल , बिहार येथून  आलेले नागरीकही मोठ्या संख्येने राहतात. या नागरिकांचे पोट हातावर आहे. त्यामुळे संचारबंदी लागु झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांंना सतावू लागला. या मंडळींनी पुन्हा गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र संकेतस्थळावरून आरक्षण कसे करावे याची माहिती नसल्याने या सर्व नागरिकांनी डोंबिवली स्थानक गाठले. मात्र डोंबिवली स्थानकात आरक्षण खिडकीच सुरू नसल्याने या सर्व नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यानंतर सोमवार पासून बरीच कार्यालये सुरू होणार असल्याचे कळताच या कामगारांना आरक्षण खिडकी सुरू होईल असे वाटले. मात्र अद्यापही खिडकी सुरू झाली नसल्याचे पाहताच या नागरिकांचा हिरमोड झाला. बाहेरून आरक्षण काढून घेतले तर पैसे अधिक लागतात. त्यामुळे बाहेर ट्रॅव्हल्स ऑन्ड टुरिझमच्या दुकानातील आरक्षण खिडकीवर जाणे शक्यच नसल्याची माहिती या नागरिकांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. विशेष म्हणजे बदलापुर सारख्या छोट्या स्थानकात देखील आरक्षण खिडकी सुरू झाली असताना डोंबिवली येथील आरक्षण खिडकी का सुरू झाली नाही असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. इतकेच नव्हे तर काही कामगार रोज खिडकीजवळ जाऊन खिडकी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. संचारबंदीच्या काळात खिडकीवर काम करणारे रेल्वे कर्मचाऱ्यांंनी आरक्षण खिडकी उघडून साफसफाई केली होती. त्यामुळे नागरिकांना आशा निर्माण झाली होती. मात्र त्यावेळी देखील संकेतस्थळ सुरू होण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली होती.विशेष म्हणजे रेल्वेच्या कर्मचा ऱ्यां साठी खास रेल्वे सोडण्यात येत असतानाही कर्मचारी कामावर रूजु नसल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे.

 

  अनेक स्थानकात अद्याापही आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली नाही. मुळातच या खिडकीवर काम करणारे कर्मचारी लांबून येत असल्याने या खिडक्या सुरू केल्या नाहीत. ज्या स्थानकात खिडक्या सुरु  करण्यात आल्या  आहेत. त्या स्थानकातील आरक्षण खिडकीसाठी काम करमारे कर्मचारी आजुबाजुलाच राहत असल्याने खिडकी सुरू करण्यात आली आहे. लवकरत सर्वच स्थानकात आरक्षण खिडक्या सुरू करण्यात येतील .
                                                                                                                                    – ए. के. जैन, मध्य रेल्वे जनसपंर्क अधिकारी

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!