ठाणे

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अंबरनाथमध्ये २ लाखाहून अधिक आर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे किटसचे वाटप

भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले- पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले वाटप
अंबरनाथ दि. १० (नवाज अब्दुलसत्तार वणू)  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या कोरोना संसर्ग संकट काळात सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करत भाजपा पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी संपुर्ण अंबरनाथ शहरात सुमारे २ लाखाहुन अधिक आर्सेनिक अल्बम ३० गोळयांचे किटस् प्रत्येक वार्ड निहाय नागरिकांच्या घरोघरी जावुन वाटप करण्यात आले.
              महाराष्ट्र् राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थी दशेत असताना सलग तेरा वर्षे अखील भारतीय विद्यार्थी परिषदेत आपल्या नेतृत्व कार्याची वेगळी छाप निर्माण केली. हजारोनीं कार्यकर्ते  घडवले. उत्कृष्ट संघटन कौशल्य आणि समर्पित भावनेने सतत काम करण्याच्या वृत्तीमुळे संघटनेने त्यांच्यावर अनेक जबाबदा-या सोपविल्या. विविध खात्यांचा दांडगा अनुभव असलेले एक अष्टपैलु राजकिय व्यक्तीमत्व हे नवतरूण कार्यकर्त्यांच्या गळयातले ताईत बनले आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याची शिकवण ही आम्हा तरूण कार्यकर्त्यांना एक मोठी उर्जा असल्याचे भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी अंबरनाथ शहरातील विविध भागात प्रत्येकी वाॅर्डनिहाय नागरिकांच्या घरोघरी जावुन व अत्यावश्यक सेवेत काम करणारे तसेच बँक कर्मचारी, दुकानदार  यांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करत होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या कीट्स चे वाटप करण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!