अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले वितरण
अंबरनाथ दि. १० (नवाज अब्दुलसत्तार वणू) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहराच्या वतीने शहरातील नागरिकांना व कामगारांना “मोफत अर्सेनिक अल्बम ३०” च्या गोळ्यांचे वितरणाचा कार्यक्रम अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व युवक ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी आयोजित केला जातो. नागरिकांना घरोघरी जाऊन व कामगारांना अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्यांचे वितरण करण्यात आले. सदर आयुष्य मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाचा पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोविड-१९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमोओपॅथी गोळ्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, सुनील अहिरे, समाजसेविका आशा पाटील, अश्विनी पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, सोशल मीडिया सेल विधानसभा अध्यक्ष मिलिंद मोरे, कृष्णा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.