डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर बाज आर.आर. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कदम हे नेहमी जनतेच्या अडीअडचणीत मदतीसाठी पुढे असतात.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असतानाही त्यांनी जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेला मदत केली. पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेलाहि त्यांच्या कामात सहकार्य करणाऱ्या कदम यांना `कोरोना योद्धा`प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.त्यांना सर्व राजकीय पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार यांचे फोने आले असून तब्बेतीची काळजी घ्या असा सल्ला दिला.
मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांना कोरोनाची बाधा
June 12, 2020
312 Views
1 Min Read

-
Share This!