मुंबई : कोरोनोच्या प्रादुर्भाव यामुळे सर्व व्यवहार, नोकरी व व्यवसाय बंद झाल्याने मध्यमवर्गीय पालकांना जगणे कठिण झाले आहे. या बिकट परिस्थितीत पालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम श्री सरस्वती विद्यामंदिर, भांडुप या शाळेने आखला. कोटक एज्युकेशन फाउंडेशन व गोदरेज कंपनी यांच्या मदतीने 350 गरजू पालकांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सर्व सरकारी नियम पाळून केले.
…. विशेषतः कोकणातील गरीब कुटुंबातील अतिशय गुणी व कलागुण संपन्न मुले हे श्री सरस्वती विद्यामंदिर शाळेचे वैभवच आहे. या मुलांनी मिळवलेल्या पारितोषिकांनी शाळेचे कार्यालय भरून गेले आहे. यावर्षी तर सहावीच्या मुलांनी केलेल्या पाणीबचत प्रकल्पाने राज्यस्तरावर मजल मारली. शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश, सांस्कृतिक कार्यक्रमात तर कमालच करणारे विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा सहभाग, शाळांत परीक्षेतही उल्लेखनीय यश ही या शाळेची वैशिष्टय़े आहेत. 16 मार्च पासून शाळा बंद असली तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू आहे. चौथी गुलाब वर्गातील मुलांनी Lockdown Work from Home मध्ये केलेल्या उत्तम कार्यानुभव विषयातील कलाकृती तर या वर्षीच्या कार्यानुभव पुस्तकात निवडल्या गेल्या हे कौतुकास्पद गोष्ट ठरली.
अशा गुणी मुलांना व पालकांना आर्थिक चणचणींमुळे जगणे कठिण झाले. या पालकांना आधार देण्याचा विचार शाळेचे संचालक श्री. वसंत सावंत साहेब यांनी केला. संचालिका सौ. वर्षा सावंत मॅडम व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका यांनी झूम च्या माध्यमातून शिक्षकांशी सुसंवाद साधला. सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गातील गरजू मुलांची यादी तयार केली. पालकांशी संपर्क साधून सुरक्षिततेचे सर्व उपाय पाळून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या मदतीमुळे पालकांना जगण्याची नवी उमेद मिळाली.
… हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक सन्मानीय श्री. वसंत सावंत साहेब, संचालिका सौ. वर्षा सावंत मॅडम, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया कुरकुटे मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रुधिता बेर्डे मॅडम, किंगसटन इंग्रजी विभागाच्या प्रमुख सौ. स्वरांजली सावंत मॅडम आणि सर्व विभागातील शिक्षक, लिपिक व सेवक वर्ग यांनी मनापासून प्रयत्न केले.