ठाणे महाराष्ट्र

पोलीस उपनिरिक्षक सचिन सरडे यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर.

ठाणे (ता 13 जून, संतोष पडवळ) :  ठाणे शहर हद्दीतील मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिस चौकी चे पोलीस उपनिरिक्षक श्री सचिन सरडे यांनी गडचिरोली सारख्या नक्षलवादी जिल्ह्यातील केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकार प्रशासनाने आंतरिक सुरक्षा पदक जाहीर करून सन्मानित करण्यात आले आहे.

पोलीस खात्यात सन 2013 च्या ब्याचला भरती झालेले श्री सचिन सरडे गडचिरोली येथे सन 2014 ते 2017 मध्ये गडचिरोलीच्या भामरागड या अति दुर्गम अशा धोडराज तसेच पेंढारी डिव्हिजन मधील छत्तीसगड सीमे लागत असलेल्या गोदलवाही येथे प्रभारी म्हणून काम केले होते . सदर कालावधीमध्ये दोन नक्षल सरेंडर करण्यात त्यांना यश आले होते तसेच 2014 व 2017 ची निवडणुकीत मोलाची कामगिरी पार पडली, गोदलवाही येथिल लोकांना नक्षलवादी यांचायकडून पूर्वी दिलेल्या एकुन 47 भरमार बंदुका व 19 बॅरल जमा करून नक्षलवाद्यांच्या मोहीमेचे श्री सरडे यांनी कंबरडे मोडले होते , मूळचे सातारा तालुक्यातील आकले हया गावचे असून ट्रेंनिग नंतर पहिली पोस्टिंग गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली होती.

मागिल वर्षी त्यांना महाराष्ट्र शासना कडून गडचिरोली तिल विशेष व खडतर कामाबद्दल सेवा पदक मिळाले आहे. सद्या 2017 पासून ठाणे शहर पोलिसात सेवा बजावत आहेत प्रसंगी सर्व क्षेत्रातुन त्यांचं अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!