ठाणे

भाजप गटनेते शैलेश धात्रक यांची विशेष महासभेची मागणी..

नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे ? 
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरिना  नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे ? असा प्रश्न विरोधी बाकावर बसलेल्या भाजपने सत्ताधारी पक्ष शिवसेना  आणि पालिका प्रशासनाला विचारला आहे.भाजप गटनेते शैलेश धात्रक यांनी यासाठी विशेष महासभेची मागणी केली.वास्तविक पालिका प्रशासनाचा अश्या परिस्थिती गोंधळ उडाला असून शहरातील कोरोनाचा रुग्णांसाठी प्रशासन नक्की काय भूमिका बजावत आहे हे जनतेला समजले पाहिजे म्हणून भाजपची ही मागणी रास्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.खर तर यावर काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांनीही जोर देणे आवश्यक आहे.
याबाबत गटनेते शैलेश धात्रक म्हणाले, जगभर कोरोनाच्या हाहाकारामुळे गेल्या साधारणत: पावणे तीन महिन्यापासून  संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊन सुरू आहे.महापालिका क्षेत्रात कोविड-१९  या आजारामुळे आतापर्यँत जवळजवळ १०७६ रुग्ण या आजारावर उपचार घेऊन घरी गेलेत तर साधारणतः १२०० रुग्ण आजही उपचार घेत आहेत, दुर्दैवाने ६० नागरिकांचा आज पर्यंत या आजाराने मृत्यू देखील झालेला आहे. या गंभीर विषयात महापालिका प्रशासन काहीअंशी नागरिकांना सेवा देण्यात यशस्वी झाले असले तरी बऱ्याच प्रमाणात नागरिक या आजारातील रुग्णांना सेवा देण्यास प्रशासन कमकुवत व निष्काळजी पणाने वागल्या सारखे देखील जाणवत आहे. संशयित रुग्णांचे रिपोर्ट यायला बराच कालावधी लागत आहे त्याविषयी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून विविध प्रकारची कारणे सांगितली जात आहेत. तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्यासस ॲम्बुलन्ससाठी फार मोठी कसरत देखील करावी लागत आहे. महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या एकाही हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध नसल्यामुळे तेथे सिरीयल पेशंटना सेवा देणे शक्य होत नाही. तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे त्याची संख्या पाहता वाढत जाणाऱ्या पेशंटच्या मानाने ती खुपच कमी आहे. त्यामुळे सिरीयस पेशंटला सेवा देणे फार मोठे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे पुरेशी व्हेंटिलेटर व्यवस्था होईपर्यंत मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देण्यासाठीची व्यवस्थादेखील महापालिके द्वारे त्वरित करण्यात येणे अतिशय गरजेचे आह. सिरीयस पेशंटना लागणारी औषधे (उदा. Inj Ramdesvir, Inj Tosilizumab व इतरसर्व) देखील महापालिकेव्दारे वेळेवर व पुरेशी उपलब्ध होत नाहीत असे पेशंटच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. तर महापालिकेत या विषयाशी संबंधित सेवा देणाऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांची देखील कमतरता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) वतीने काही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या संस्थेच्या डॉक्टर्स मार्फत सेवा देण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे  पेशंटना काही प्रमाणात दिलासा देखील मिळत आहे अन्यथा परिस्थिती फार गंभीर झाली असती. दिवसेंदिवस पेशंट संक्रमित होण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत असताना आपल्याकडे असलेली विद्यमान स्थितीतील हॉस्पिटलची क्षमता जवळपास संपत आल्यामुळे यापुढे नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांसाठी महापालिका प्रशासनाने काय व्यवस्था केली आहे ? याबाबत महापालिकेतील लोकप्रतिनिधींना समजणे गरजेचे आहे.
तसेच या भयानक परिस्थितीत कोरोनाने भयभीत व आर्थिक रित्या दुर्बल झालेल्या नागरिकांना आपण कचरा विलगीकरण करण्याच्या उपक्रमात सक्तीने अडकवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे देखील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना महापालिके बद्दल नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. तसेच पालिकेच्या या हट्ट-वर्धित उपक्रमामुळे शहरभर कचऱ्याचे ढीग साचून शहरवासियांना दुर्गंधीचा सामना देखील करावा लागला आहे. पावसाळा हळूहळू सुरू झाला आहे. जर आपल्या या उपक्रमामुळे कचऱ्याचे ढीग शहरभर साचले तर नागरिकांना भविष्यात मोठ्या आजाराला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यामध्ये होणारी कामांची सद्यस्थिती काय आहे.  या सर्व समस्यांबाबत प्रशासनाने नागरिकांना सेवा देण्यासाठी कोणकोणत्या पर्यायी व अधिक व्यवस्था केल्या आहेत त्याबाबत महानगरपालिकेत नागरिकांकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना माहिती देण्यासाठी तसेच नागरिकांकडून आलेल्या सूचनांची माहिती लोकप्रतिनिधी मार्फत प्रशासनाला देण्यासाठी कल्याण- डोंबिवली महानगरपालिका पालिकेची लवकरात लवकर विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले पाहिजे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!