डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या मार्गदर्शखाली माजी सरपंच योगेश पाटील यांच्या वतीने घारीवली गावातील गणपती मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. याप्रसंगी मनसे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत, शहर सचिव अरुण जांभळे, माजी उपविभाग अध्यक्ष संदीप ( रमा ) म्हात्रे, कौतुभ लिमये आदि उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत रक्तदान शिबीर
June 15, 2020
23 Views
1 Min Read

-
Share This!