डोंबिवली ( शंकर जाधव ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत मनसैनिकांनी कोरोना बाधीत रूग्ण जेथे उपचार घेत होते त्या टाटा आमंत्रा कोविड केंद्रात आवश्यक असलेला फळ वाटप केले. माजी उपविभाग अध्यक्ष संदिप(रमा)भास्कर म्हात्रे यांनी टेम्पो सेनिटाइज़ केलेल्या टेम्पोतून १००० फळ किट आणण्यात आले होते. मनोज घरत,अरूण जांभळे, विकी चौधरी, कौस्तुभ लिमये,प्रितेश म्हामूणकर,सागर मुळये ,समिर चाळके यांचा सोब टाटा आमंत्रा कोविड केंद्र (भिवंडी ) येथे गेले.टाटा कोविड केंद्राचे मुख्य अधिकारी प्रमोद मोरे (क.डों.म.पा), डॉ.दिपाली साबळे, मोरे यांनी मनसैनिकांना या कामात मदत केली. मनसैनिकां त्यांच्याकडील फळांचे कीट मुख्य अधिकारी प्रमोद मोरे त्याच्या कडे दिले. येथील सर्व डॉक्टर्स, परीचारीला आणि सर्व कर्मचारी हे खरे कोरोना योध्दे आहेत अश्या शब्दात मनसैनिकांनी त्यांचे कौतुक केले. या उपक्रमाला जिल्हा अध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते प्रकाश गोपीनाथ भोईर,माजी नगरसेवक हर्षद पाटिल,शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत रुग्णांना फळे वाटप
June 15, 2020
86 Views
1 Min Read

-
Share This!