ठाणे

अंबरनाथमधील रेल्वे आरक्षण केंद्र उघडले

भाजप शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांच्या मागणीला आले यश
 
अंबरनाथ दि. १६ (नवाज अब्दुलसत्तार वणू)  कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन पासून बंद असलेली अंबरनाथ येथील रेल्वे आरक्षण खिडकी सुरू करून रेल्वे तिकीट आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचा परतावा देण्याची व्यवस्था अंबरनाथलाच करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामागणीला नुकतेच यश आले आहे.
            कोरोना विषाणूमुळे लाॅकडाउन पासुन बंद असलेले अंबरनाथ रेल्वे आरक्षण केेंद्र अनलाॅकच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी १३ जुनपासुन प्रवाशांच्या सेवेसाठी पुनःश्च उघडण्यात आले असुन पहिल्याच दिवशी आपल्या इच्छीस स्थळी जाणाऱ्या सुमारे १५० प्रवाशांनी नव्याने आरक्षण केले, तर १३१ प्रवाशांनी आपल्या रद्द झालेल्या रेल्वे टिकिटांचा परतावा घेतला. दरम्यान साधारण २ लाख १५ हजार ५८५  रूपये रेल्वे प्रशासनाला परत करावे लागले. मध्य रेल्वेच्या कल्याण – कर्जत रेल्वे मार्गावरील कल्याण व बदलापुर रेल्वे स्थानकातील प्रवासी आरक्षण केंद्र सुरू झाले आहे. अंबरनाथमध्ये रेल्वे तिकिट आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांचा परतावा देण्याची व्यवस्था अंबरनाथलाच करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांनी केली होती. दरम्यान शनिवार १३ जुनपासुन अंबरनाथ रेल्वे आरक्षण केंद्र उघडण्यात आले असुन सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत नविन आरक्षण व रद्द आरक्षण तिकीटांचा परतावा केला जाणार आहे.आरक्षण केंद्रात आरपीएफ
पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम व्यवस्थापन केले आहे. प्रवाशांना आपल्या इच्छीत स्थळी पोहचण्यासाठी महानगरी, पुष्पक, कुशीनगर, कामायनी, पवन, पटना स्पेशल कोर्णाक, नेत्रावती, उद्यान आदी १५ मेल एक्सप्रेस गाडयांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!