ठाणे

कल्याण कृषी विभागामार्फत भात पिकावरील शेती शाळा वर्ग सुरू

ठाणे   (प्रतिनिधी मिलिंद जाधव )  : कल्याण तालुक्यातील  चिंचवली येथे शेतकऱ्यांसाठी भात पिकाची शेती शाळा वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या मध्ये गावातील २० शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या शेतावर भात पिकाची विविध प्रत्यक्षिकाद्वारे दर पंधरवड्यात शेती शाळेचे ८ ते ९ वर्ग घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत। आतापर्यंत  २ वर्ग  घेण्यात आले असून , यामध्ये भात बियाणे ,खते व कीटकनाशके खरेदी करतांना कोणती काळजी घ्यावी, बीज प्रक्रिया करणे , चारसूत्री भात लागवड पद्धत , मृद आरोग्यपत्रिकेचे तांत्रिक मार्गदर्शन, हिरवळीचे खत म्हणून गिरीपुष्प पाल्याचा वापर, गादीवाफ्यावरील रोपवाटिकेचे व्यवस्थापन व बांधावर तूर लागवडीची माहिती प्रत्यक्षिकाद्वारे व विविध खेळा द्वारे माहिती देण्यात आली . तसेच या पुढील वर्गात भातपिकाचे मृदआरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन , कीड ,रोग व तण नियंत्रण व्यवस्थापन, तसेच भात पीक परिसंस्था विश्लेषण  (RESA) निरीक्षणाद्वारे मित्र कीड -शत्रू कीड ओळख,पीक कापणी व काढणी पश्चात व्यवस्थापन या सारख्या विषयावर सखोलपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे कृषी सहाय्यक विवेक दोंदे  यांनी माहिती देतांना सांगितले.
        तसेच कल्याण तालुक्यात भातपिकाच्या एकूण ९ शेतीशाळा व २ तुर पिकाच्या शेती शाळा सुरू झाल्या आहेत असे कल्याण
तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे  यांनी बोलताना सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!