ठाणे

 घारीवली गावचे माजी सरपंच योगेश पाटील उचलणार चार गावातील ३५०  विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा शैक्षणिक खर्च

डोंबिवली ( शंकर जाधव ) :  आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा व्हावा म्हणून प्रत्येकाला वाटत असते. पंरतु वाढदिवस हा समाजसेवेसाठी उत्तम दिवस असे मानणारे फार कमीजण असतात.मनसेच्या एका पदाधिकार्याने आपला वाढदिवस गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्यात उजाळा देणारा ठरला. डोंबिवली जवळील घारीवली गावचे  माजी सरपंच तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे पदाधिकारी योगेश रोहिदास पाटील त्यांच्या १६ जू रोजी  वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता घारीवली, काटई, उसरघर आणि संदप या गावातील ३५० शालेय विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा शैक्षणिक साहित्याचा खर्च स्वखर्चाने करणार आहेत. जगभर पसरलेल्या कोरोनाच्या महामारीत समस्त नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल झाले आहेत. त्यामुळे या वर्षी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता ऊपरोक्त चारही गावातील विद्यार्थ्यांना एक वर्षाचा शैक्षणिक साहित्याचा खर्च स्वखर्चाने उचलून वाढदिवस साजरा करण्याचा हा अभिनव उपक्रम राबविल्याने त्यांचे मनसैनिकांनीच नव्हे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले.मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी माजीं सरपंच योगश पाटील यांचे कौतुक करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नेहमी जनतेची सेवा करत रहा असा सल्ला दिला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!