मुंबई

जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन

मुंबई : महाराष्ट्राच्या पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज (दि.१६) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चळवळीतून पत्रकारितेत आलेल्या दिनू रणदिवे यांनी पत्रकारितेत लोकशाहीचे मूल्यं रुजवली.

गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते. आचार्य अत्रेंसमवेत त्यांनी त्यावेळी तुरुंगवासही भोगला होता. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली. २०१८ चा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. शोषितांसाठी आवाज उठवणारी पत्रकारिता त्यांनी केली. ते महाराष्ट्राच्या जडणघडणीचे साक्षीदार नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी दिली. दिनू रणदिवे यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये पत्रकारिता केली. १९८५ साली ते तेथून निवृत्त झाले होते. गेल्याच महिन्यात त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे निधन झाले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!