भाजपाने अंबरनाथ तहसीलदारांना निवेदनद्वारे केली मागणी
अंबरनाथ दि. १६ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कोविड – १९ च्या महामारीच्या काळात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ते आजतागायत अविरतपणे आपली सेवा देऊ करणारे बँक कर्मचारी व खाजगी अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुरू होऊन देखील प्रवास करण्यासाठी परवानगी मिळाली नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा कर्मचारी म्हणून लोकल ट्रेन व बस इत्यादी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतुन प्रवास करण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले – पाटील यांनी अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी दिलीप कणसे, राजेश नाडकर, अजित खरात, श्रीकांत रेड्डी आदी पदाधिकारी उपस्थित होते.